Shruti Vilas Kadam
दिवसभर काम केल्याने मान आणि खांद्यांमध्ये ताण जाणवू शकतो. बोटांनी हलक्या हाताने गोलाकार मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळू शकतो.
कपाळावर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. विशेषतः भुवयांच्या वरच्या भागावर सौम्य दाब दिल्यास रिलॅक्स वाटू शकते.
टाळूवर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे शरीराला रिलॅक्स वाटण्यास मदत होऊ शकते.
कानांच्या मागील भागावर आणि आसपास हलक्या हाताने मसाज केल्याने आराम मिळून स्ट्रेट कमी होऊ शकतो .
मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर सतत काम केल्यामुळे हातांवर ताण येतो. तळहात आणि बोटांना हलका मसाज दिल्यास आराम मिळू शकतो.
दिवसभर उभे राहणे किंवा चालणे यामुळे पाय थकतात. झोपण्यापूर्वी तळपायांना हलक्या हाताने मसाज केल्याने रिलॅक्स होण्यास मदत होते.
पाठीच्या स्नायूंमध्ये ताण जाणवत असल्यास पाठीवर हलका मसाज करून घेऊ शकता. स्वतःहून मणक्यावर जोरात दाब देणे टाळा.