Navratri Ethnic Looks: नवरात्रीत दिसायचंय हटके? ट्राय करा 'हे' ७ ट्रेंडी एथनिक लुक्स; गरबा-दांडियासाठी परफेक्ट

Shruti Vilas Kadam

लेहेंगा-चोली लुक

नवरात्रीसाठी रंगीबेरंगी लेहेंगा-चोली हा परफेक्ट पर्याय आहे. मिरर वर्क, एम्ब्रॉयडरी किंवा सीक्विन डिझाइन असलेला लेहेंगा तुमचा लुक अधिक आकर्षक बनवेल.

Lehenga Selection

गुजराती चनिया चोळी

गरबा आणि दांडियासाठी पारंपरिक गुजराती चनिया चोळी ट्राय करा. त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि रंगीत दुपट्टा कॅरी केल्यास लुक खुलून दिसेल.

Mirror work ghagra-choli | pinterest

पैठणी साडी लुक

महाराष्ट्रीयन पारंपरिक लुक हवा असेल तर पैठणी साडी उत्तम पर्याय आहे. वेगवेगळ्या स्टाईलने साडी ड्रेप करा. त्यावर नथ, ठुशी आणि पारंपरिक दागिन्यांसह हा लुक अधिक सुंदर दिसतो.

Paithani

इंडो-वेस्टर्न लुक

ट्रेडिशन लूकला मॉडर्न टच देणारा द्यायचा असेल तर इंडो-वेस्टर्न आउटफिट निवडा. एथनिक स्कर्टसोबत क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्ती कॅरी करू शकता.

Anarkali Dress

अनारकली सूट

नवरात्रीच्या पूजेसाठीअनारकली सूट आकर्षक दिसतो. त्यासोबत झुमके आणि मॅचिंग दुपट्टा तुमचा लुक पूर्ण करतील.

Anarkali Dress

शरारा सेट

शरारा सेट सध्या ट्रेंडमध्ये आहे. एम्ब्रॉयडरी किंवा मिरर वर्क असलेला शरारा सेट नवरात्रीसाठी स्टायलिश आणि आरामदायी पर्याय ठरू शकतो.

Sarara Suits

साडीचा मॉडर्न ड्रेप

साडीला पारंपारिक पद्धतीऐवजी बेल्ट किंवा वेगळ्या ड्रेपिंग स्टाइलमध्ये कॅरी करून मॉडर्न एथनिक लुक देता येतो. त्यावर स्टेटमेंट ज्वेलरीने तुमचा लुक अधिक उठावदार करा.

Saree Styling Tips For Woman

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा