Shruti Vilas Kadam
बहुतेक लोकांसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुणे योग्य ठरू शकते. यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेल, घाण आणि घाम दूर होण्यास मदत होते.
टाळू जास्त तेलकट होत असेल तर केस अधिक वेळा धुण्याची गरज भासू शकते. मात्र, दररोज केस धुणे प्रत्येकासाठी योग्य नाही.
केस आणि टाळू कोरडे असल्यास वारंवार शॅम्पू केल्याने नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे केसांचा कोरडेपणा आणि रफनेस वाढू शकतो.
केस धुतल्याने केस थेट झपाट्याने वाढत नाहीत. मात्र, स्वच्छ टाळू ठेवल्याने केसांच्या आरोग्यासाठी योग्य वातावरण राखण्यास मदत होते.
केसांच्या प्रकारानुसार सौम्य शॅम्पू निवडा. शॅम्पू थेट केसांना जास्त प्रमाणात लावण्याऐवजी टाळूवर लावा.
शॅम्पू करताना बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. नखांनी टाळू खाजवल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो.
मोठ्या प्रमाणात केसगळत असतील तर केवळ केस धुण्यावर अवलंबून राहू नका. वेळेवर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.