Skin Care: ओपन पोर्स कमी करुन चेहरा होईल नॅचरल ग्लोईंग, फक्त रात्री झोपताना ५ मिनिटांत लावा हा होममेड जेल

Shruti Vilas Kadam

जेल कसे तयार करावे

एका वाटीत १ चमचा एलोवेरा जेल, १ चमचा गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन E कॅप्सूलमधील तेलाचे काही थेंब घ्या आणि व्यवस्थित मिसळा.

Face Care

चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत

चेहरा स्वच्छ धुवून तयार केलेल्या जेलचा पातळ थर लावा. १५-२० मिनिटे ठेवून चेहरा साध्या पाण्याने धुवा. सुरुवातीला आठवड्यातून २-३ वेळा वापरून पाहू शकता.

Face Care | Saam Tv

त्वचा मॉइश्चरायझिंग होते

एलोवेरा जेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात गुलाबपाणी मिसळल्याने त्वचेला ताजेतवाने आणि मऊ वाटू शकते.

Face Care | Saam tv

कोरडी त्वचा मऊ होण्यास मदत

व्हिटॅमिन E त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी वापरले जाते. ड्राय त्वचा असल्यास या जेलचा वापर केल्याने त्वचा अधिक मऊ वाटू शकते.

Face Care | Saam Tv

त्वचेला फ्रेश लुक मिळतो

गुलाबपाणी त्वचेला थंडावा आणि फ्रेशनेस देण्यासाठी लोकप्रिय आहे. एलोवेरा जेलसोबत वापरल्याने चेहरा ताजातवाना दिसण्यास मदत होऊ शकते.

Face Care | Saam Tv

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत

हवामानामुळे त्वचा ड्राय, डल आणि निस्तेज वाटत असल्यास एलोवेरा जेलचा वापर फायदेशीर ठरू शकतो. त्यात व्हिटॅमिन E मिसळल्याने ओपन पोर्स बंद होण्यास मदत होते.

Face Care | Saam Tv

वापरण्यापूर्वी ही काळजी घ्या

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.

Face Care | Saam tv

fennel ajwain cumin water: सकाळीची सुरुवात करा बडीशेप-ओवा-जिरा पाण्याने; वजन कमी करणे ते डायबिटीजसाठी फायदेशीर

fennel ajwain cumin water | Saam Tv
येथे क्लिक करा