Shruti Vilas Kadam
रात्री भिजवलेले बडीशेप, ओवा आणि जिऱ्याचे पाणी सकाळी उटल्यावर कोमट करुन घ्या. हे पाणी सकाळी प्यायल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात.
बडीशेप, ओवा आणि जिरे पचनास सहाय्य करू शकतात आणि जेवणानंतर होणारी जडपणाची भावना कमी करण्यास मदत होऊ शकते.
ओवा आणि जिरे यांचा वापर पूर्वीपासून गॅस, पोटफुगी आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी केला जातो. यामुळे पोटाचे त्रास कमी होण्यास मदत होते.
या पाण्यामुळे सकाळी होणारा अॅसिडिटीचा त्रास हळू हळू कमी करतो. यामुळे दिवसभर जेवण पचायला मदत होते आणि आंबट ढेकर येणे कमी होतात.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात शरीराला आवश्यक पाणी मिळण्यापासून होते. यामुळे शरिराला हायड्रेशनचा त्रास कमी होतो.
बडीशेप आणि जिऱ्याचा सुगंध व चव तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे तोंडातून वास येत नाही.
जिऱ्याने रक्तातील साखरेच्या नियंत्रणास काही प्रमाणात मदत मिळते. मात्र डायबिटीजवरील औषधांचा हा पर्याय नाही.