ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढत आहे. महिला आणि पुरुष दोघांमध्येही वंध्यत्वाची समस्या उद्भवत आहे.
या समस्येमध्ये, दोघांपैकी एकाची प्रजनन क्षमता नष्ट होते आणि निरोगी शुक्राणू तयार करण्यात अडचण येऊ शकते. तर महिलांना गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत अडचणी येतात.
या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये ताण हे देखील एक मोठे कारण आहे.
जास्त मानसिक ताणवामुळे पुरुरषांमध्ये स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया कमकुवत होते.
ताणवामुळे पुरुषांच्या फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
तणावामुळे टेस्टोस्टेरोन आणि ल्यूटिनाइजिंग हार्मोन सारख्या महत्वाच्या हार्मोन्सची पातळी कमी होते.
महिलांमध्ये, ताणवामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि ताणामुळे ओव्हुलेशनवर परिणाम होऊ शकतो.