Siddhi Hande
पाणीपुरी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. तुम्ही मुंबईची स्पेशल स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी आता घरी बनवू शकतात.
पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रगडा बनवावा लागेल.
त्यासाठी तुम्हाला पांढरे वाटाणे रात्रभर भिजवावे लागतील. त्यानंतर पांढरे वाटाणे आणि बटाटा उकडून घ्या.
यानंतर एका बाऊलमध्ये वाटाणे आणि बटाटे मॅश करुन घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला.
या मिश्रणात काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त मिक्स करुन घ्या.
पाणीपुरीचे तिखट पाणी बनवण्यासाठी पुदीना, आलं-लसूण, मिरची, कोथिंबीर छान वाटून घ्या.
यानंतर हे मिश्रण चांगले गाळून घ्या. त्यात पाणी टाका. त्यात पाणीपुरी मसाला, जलजीरा आणि चाट मसाला टाका.
यानंतर गोड पाणी बनवण्यासाठी मिक्सला चिंच, खजूर, साखर वाटून घ्या. तेदेखील छान गाळून घ्या. यानंतर त्यात पाणी टाका.
तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये हा मसाला, तिखट-गोड पाणी टाकून त्यावर मस्त शेव टाकून खाऊ शकतात.
Next: मराठमोळी थोडीशी साधी भोळी...धुळ्याची लेक गाजवतेय दाक्षिणात्य इंडस्ट्री