Siddhi Hande
मृणाल ठाकूरने हिंदीसह टॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मृणाल ठाकूर ही मूळची धुळ्याची आहे.
मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी धुळ्यात झाला.
मृणालने शालेय शिक्षण जळगावमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले. त्यानंतर वसंत विहार हाय स्कूलमध्ये शिकली.
मृणाल जरी बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये काम करत असली तरीही ती मराठी संस्कृती जपते.
मृणालने नुकताच गुढीपाडवा साजरा केला.
मृणालने पारंपारिक पद्धतीने घराच्या बाल्कनीत गुढी उभारली होती.
मृणालने छान ड्रेस घातला होता. कपाळावर टिकली अन् नाकात नथ असा साजश्रृंगार तिने केला होता.
मृणाल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.