Shreya Maskar
समोसा पारी बनवण्यासाठी मैदा, तूप, ओवा, पाणी, मीठ इत्यादी साहित्य लागते.
सारण बनवण्यासाठी बटाटा, काजू, हिरवे वाटाणे, लिंबू आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
सारण बनवण्यासाठी मिरची, लसूण, आले, कोथिंबीर, बडीशेप, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ इत्यादी मसाले लागतात.
समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून मॅश करून घ्या.
एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, तेल, मीठ आणि पाणी टाकून छान पीठ मळून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसूण, बटाटा आणि बाकी साहित्य टाकून मिक्स करा.
मैद्याच्या पिठाचा गोळा करून त्याची पोळी लाटून त्रिकोण करून त्यात सारण भरा.
समोसा तेलात गोल्डन फ्राय होईपर्यंत छान तळून पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.