Shreya Maskar
बाहेरची पाणीपुरी खाण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने पाणीपुरी बनवा.
पाणीपुरी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, उकडलेले काळे चणे, कांदा, दही, चिंचेची चटणी आणि बूंदी इत्यादी पदार्थ लागतात.
चाट मसाला, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ इत्यादी मसाले लागतात.
पाणीपुरीचा मसाला बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
या मिश्रणात काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकत्र करा.
दुसऱ्या बाऊलमध्ये जलजीरा आणि बूंदी घालून आंबट पाणी तयार करून घ्यावे.
गोड चटणी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही, चिंचेची चटणी, आंबट पाणी आणि कोथिंबीर मिक्स करा.
पाणीपुरीसाठी रव्याच्या पुऱ्यांचा वापर करा.