Shreya Maskar
ड्रायफ्रूट्स थंडाई बनवण्यासाठी फुल क्रीम दूध, साखर, ड्रायफ्रूट्स, भोपळ्याच्या बिया , केशर, वेलची, दालचिनी आणि गुलाबाची सुखी पाने आणि पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.
ड्रायफ्रूट्स थंडाई बनवण्यासाठी एका भांड्यात फुल क्रीम दूध टाकून उकळी काढून घ्या.
दूध तापत असताना त्यात ड्रायफ्रूट्स, खसखस आणि भोपळ्याच्या बिया बारीक करून टाका.
दुधाला उकळी आल्यावर त्यात केशर आणि साखर घालून मिक्स करा.
त्यानंतर गुलाबाची सुखी पाने आणि पाकळ्या , काळी मिरी, वेलची बारीक करून दुधात मिक्स करा.
छोट्या बाऊलमध्ये वेलची आणि दालचिनी टाकून त्याची पावडर बनवून घ्या.
दूध थंड झाल्यावर त्यात मसाला टाकून थंडाईचा आस्वाद घ्या.
तुम्ही यात बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता.