Shreya Maskar
गुजिया बनवण्यासाठी मैदा, साखरेचा पाक, तूप, खवा, साखर, वेलची पावडर, किसलेले बदाम, मनुके आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
गुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तूप, मैदा आणि पाणी मिसळून कणिक मळून घ्या.
पीठ सेट करण्यासाठी कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवा.
आता एका पॅनमध्ये खवा मंद आचेवर भाजून त्यात किसलेले बदाम, वेलची पूड, मनुके आणि पिठीसाखर घाला.
मळलेल्या पिठाच्या गोलाकार पुऱ्या तयार करून त्यात खव्याचे मिश्रण भरा.
त्यानंतर मैद्याच्या पिठाला गुजियाचा आकार द्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गुजिया खरपूस तळून घ्या.
गुजिया ताटात काढून तुम्ही त्यावर थंड साखरेचा पाक पसरवून गुजियांचा आस्वाद घ्या.