Manasvi Choudhary
नाश्त्याला मसाला डोसा खायला सर्वांनाच आवडतो.
मसाला डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मसाला डोसा घरी बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ, मेथी दाणे, चणाडाळ, मोहरी, हळद, बटाटा, मसाला, तेल, हिंग, कांदा, हिरव्या मिरच्या, मीठ हे साहित्य घ्या.
डोसा बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ, मेथी दाणे आणि चणाडाळ हे 6 ते 7 तास भिजवून बारीक वाटून घ्या.
नंतर एका भांड्यात हे घेऊन त्यामध्ये मीठ आणि थोडेस पाणी घालून मिक्स करा.
Masala Dosa Recipe
एका बाजूला गॅसवर कढईत तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ताची फोडणी द्या.
यानंतर यामध्ये आलं- लसूण पेस्ट घालून, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
नंतर या संपूर्ण मिश्रणात उकडलेला बटाटा घालून एकजीव करा.
गॅसवर गरम तव्यावर हे मिश्रण घाला आणि नीट पसरून घ्या. त्यावर बटाट्याची भाजी घाला
अशाप्रकारे सर्व्हसाठी मसाला डोसा तयार आहे.