Siddhi Hande
हक्का नुडल्स हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. तुम्ही घरीच अवघ्या काही मिनिटांत हक्का नुडल्स बनवू शकतात.
हक्का नूडल्स बनवण्यासाठी कांद्याची पात, शिमला मिरची, टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची जाडसर कापून घ्या.
यानंतर भाड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात नूडल्स ३-४ मिनिटे उकडून घ्या.
यानंतर एका पॅनमध्ये तेल टाका. त्यात कांदा आँणि हिरवी मिरची परतून ध्या.
यानंतर उरलेल्या सर्व भाज्या टाकून १ मिनिट परतून घ्या. या भाज्या जास्त वेळ परतवू नका.
त्यात सोया सॉस, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस आणि मीठ टाका.
त्यानंतर त्यात उकडलेले नूडल्स टाकून मस्त परतून घ्या.