Shreya Maskar
दही समोसा चाट बनवण्यासाठी समोसा, दही, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ आणि आलू भुजिया इत्यादी साहित्य लागते.
दही समोसा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम तळलेले खरपूस समोसे एका बाऊलमध्ये कुस्करून घ्या.
आता दुसऱ्या भांड्यात दही टाकून फेटून घ्या.
यानंतर या मिश्रणात चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
आता समोसा तकडे एका प्लेटमध्ये पसरवा.
समोशाच्या कुस्करमध्ये दही, कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर पसरवून घ्या.
यात वरून चाट मसाला आणि आलू भुजिया टाकायला विसरू नका.
अशाप्रकारे चटपटीत दही समोसा चाट तयार झाला.