Dhanshri Shintre
महाशिवरात्रीचा पवित्र सण २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान भोलेनाथांना विविध स्वादिष्ट पदार्थ अर्पण केले जातात.
महाशिवरात्रीला त्यांना थंडाई अर्पण करणे शुभ मानले जाते. हे पारंपरिक पेय आरोग्यासाठी फायदेशीर असून शरीराला थंडावा देते.
थंडाई बनवण्यासाठी बदाम, बडीशेप, काळी मिरी, वेलची, काजू, पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या, दूध, गुलाबजल, गूळ, केशर आणि जायफळ लागते.
बदाम, खसखस, बडीशेप, काळी मिरी, वेलची, भोपळ्याच्या बिया, काजू, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवा.
भिजवलेल्या पदार्थांत थोडे दूध किंवा पाणी मिसळा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करा
सुमारे ४ कप दूध गरम करून त्यात गूळ किंवा साखर घाला आणि चांगल्या प्रकारे एकत्र मिसळा.
दूध थंड झाल्यावर, वाटलेली थंडाई पेस्ट त्यात घाला आणि नीट एकत्र मिसळा.
गुलाबजल, जायफळ पावडर आणि केशर घालून चांगले मिसळा. मग चाळणीतून गाळून थंडाई तयार करा.
ते किमान १-२ तास फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून थंडाई छान गार आणि स्वादिष्ट होईल.
तयार थंडाई ग्लासमध्ये ओता, वरून चिरलेले बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.