Siddhi Hande
हिवाळा म्हटल्यावर स्टॅॉबेरची सीझन सुरु झाला आहे. बाजारात स्ट्रॉबेरी पाहायला मिळत आहेत.
या फ्रेश स्ट्रॉबेरीचा तुम्ही मस्त मिल्कशेक बनवू शकतात. हा मिल्कशेक हेल्दी आणि टेस्टी असतो.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वात आधी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्या. त्याचे देठ काढून टाका.
यानंतर स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे घ्या. मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घ्या. त्यात थंड दूध टाका.
यामध्ये साखर, व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्सरला फिरवून घ्या.
यानंतर हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.
जर तुम्हाला हा मिल्कशेक थंड हवा असेल तर त्यात बर्फाचे तुरडून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
यानंतर हा मिल्कशेक ग्लासात ओतून सर्व्ह करा. त्यात तुम्ही बर्फाचे तुकडेदेखील टाकू शकतात.