Chetan Bodke
अशे अनेक फळं आहेत जे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. त्यातीलच एक स्ट्रॉबेरी हे फळ.
स्ट्रॉबेरी आपण शेक, केक आणि चॉकलेट इत्यादीमध्ये करतो. हे पदार्थ आपल्या हेल्थसाठी जरीही आरोग्यदायी नसले तरी स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता. स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटासंबंधित उपायांसाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर असते. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते.
स्ट्रॉबेरी दातासाठीही खूप फायदेशीर आहे. दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी आणि दात मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता.
स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने हाडं मजबूत राहतात. स्ट्रॉबेरीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत राहतात.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
स्ट्रॉबेरी कॅन्सरपासून आपला बचाव करते. स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स कर्करोगापासून बचाव करतात.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी स्ट्रॉबेरी फार फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स 40 असतो, जो खूपच कमी आहे. स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.