Chetan Bodke
कडीपत्ता हा रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. कडीपत्त्याचं सेवन केल्याने आरोग्याला उत्तम फायदे होतात.
कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्यामुळे आरोग्याला चांगला फायदा होतो.
लोह, फॅट, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक कढीपत्त्यात आढळतात
कढीपत्ता शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. कढीपत्त्यातील पोषक घटक हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
कढीपत्त्यामुळे शरीरातील रक्तातील कॉलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
कढीपत्त्यात असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवते, तर बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता कोणत्याही औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. दररोज खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.
व्हिटामिन आणि लोह यांसारखे पोषक घटक असल्यामुळे कढीपत्ता आपले केसं मजबूत ठेवतात.