Chetan Bodke
सध्या बाजारामध्ये काळी द्राक्षे मोठ्या प्रमाणावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काळी द्राक्षे खाल्ल्याने शरीराला त्याचे अनेक फायदे आहेत.
द्राक्षाचे हिरवे आणि काळे असे दोन प्रकार असतात. डॉक्टर कायमच रुग्णांना काळी द्राक्षे खाण्याचा सल्ला देतात. काळी द्राक्षे खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो.
काळ्या द्राक्षामध्ये, ‘व्हिटॅमिन सी’ असतात. यामुळे आपल्या शरीरासाठी काळी द्राक्षे फार उत्तम असतात. ‘व्हिटॅमिन सी’मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
काळ्या द्राक्षाचं सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच काळी द्राक्षांमुळे तुम्ही आजारांसोबत दोन हात करू शकता.
काळी द्राक्ष खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. त्यामुळे तुमची इन्सुलीनची पातळीही नियंत्रित राहते. द्राक्षातील पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात.
काळ्या द्राक्षांमुळे हृदयासंबंधित अनेक आजार दुर होतात. काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पोटॅशियम आणि सायटोकेमिकल्स हृदयाशी संबंधित आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.
काळ्या द्राक्षामधून आपल्या हाडांना पुरेसे ‘व्हिटॅमिन के’ मिळते. ‘व्हिटॅमिन के’ शरीरातील हाडांच्या मजबूती आणि सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं असते. ॲक्सिडेंट झाल्यानंतर काळी द्राक्षे आवश्य खावे.
काळ्या द्राक्षामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. दृष्टीदोष कमी करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी आहारात द्राक्षांचा समावेश करावा.
डोळ्यांच्या रॅटिनाचे होणारे नुकसान आणि आंधळेपणा रोखण्यासाठी तुम्ही काळी द्राक्षे खावू शकता. लहान मुलांची नजर चांगली करण्यासाठी त्यांना लहाणपणीच काळी द्राक्षे खाण्याची सवय लावावी.
काळ्या द्राक्षांचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या भयंकर आजाराचा धोका कमी होतो. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, बीटा कॅरेटीन सारखे अँटि ऑक्सडंट भरपूर प्रमाणात असतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.