ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रॉबेरी आणि लिची दोन्ही पदार्थांमध्ये व्हिटामिन्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
तज्ञांच्या मते, नेहमी लोक स्ट्रॉबेरी आणि लिची यांच्या गुणवत्तेबाबत कंफ्यूज असतात.
स्ट्रॉबेरीच्या तुलनेत लिचीमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. लिची मध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी या घटकांचे प्रमाण जास्त असते.
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी स्ट्रॉबेरी खाणे चांगले असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे कब्जच्या समस्येमध्ये स्ट्रॉबेरी खाल्ल्यास आराम मिळतो. फायबरमुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहते.
स्ट्रॉबेरीमधील कॅल्शियम हाड मजबूत करण्यास मदत करतात. तसेच स्नायूंच्या आजारापासून आपले संरक्षण होते.
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पचनास मदत होते. परिणामी वजन देखील नियंत्रणात राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.