Surabhi Jayashree Jagdish
आपण दररोज स्वयंपाकात कढीपत्त्याचा वापर करतो.
कढीपत्ता आरोग्यासाठी चांगला असतो. मात्र त्याची पानं फार लवकर खराब होतात.
पण काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही कढीपत्ता बराच काळ टिकवू शकता.
कढीपत्त्याची पानं देठांपासून वेगळी करून स्वच्छ धुवा आणि कोरडी करा.
एक एअरटाईट डब्यात पेपर नॅपकिन ठेवा. त्यावर कोरडी कढीपत्त्याची पाने ठेवा. पानांवरून पुन्हा एक किचन टॉवेल किंवा पेपर नॅपकिन झाका. यामुळे कढीपत्ता साधारण १५-२० दिवस ते १ महिना ताजा राहू शकतो.
स्वच्छ आणि कोरडी कढीपत्त्याची पाने जिप-लॉक बॅगमध्ये ठेवा. बॅगमधील हवा पूर्णपणे काढून टाका. ही बॅग तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.
तुम्ही ही पानं जिप-लॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट डब्यात फ्रीजरमध्ये ठेवू शकता. फ्रीजरमध्ये ठेवल्यास पाने हिरवीगार राहतील आणि त्यांचा सुगंधही चांगला टिकून राहील.
अनेक ठिकाणी हवामानामुळे कढीपत्ता खराब होतो. असं होत असल्यावर कढीपत्ता छान एका कढईत नुसता भाजून घ्या आणि मग त्याचा चूरा करून घ्या. हा चूरा हवा बंद काचेच्या एका डब्ब्यात भरून ठेवा. अशा पद्धातीने तुम्ही अगदी पहिनाभर सुद्धा टिकवू शकता.