Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. पाऊस सुरू होताच अनेक आजार डोकं वर काढतात.
पावसाच्या दिवसांत हवेतील आर्द्रता आणि बाहेरील दूषित अन्न किंवा पाणी यांमुळे पोटाचे विकार यामुळे पावसाच्या दिवसात अतिसार होतो ज्यामध्ये वारंवार, पातळ- पाण्यासारखे शौचास होते.
जुलाब होण्यावर तुम्ही वेळीच उपाय करणे महत्वाचे आहे. नाहीतर शरीरात थकवा, अशक्तपणा येऊ शकतो.
दही आणि इसबगोलचा वापर तुम्ही जुलाब थांबवण्यासाठी करा.
एका वाटीमध्ये एक चमचा इसबगोल दह्यात मिसळून दिवसातून एकदा घ्या आराम वाटेल
पावसाळ्यात अतिसारचा त्रास झाल्यास तुम्ही तळलेले तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे बंद करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.