Manasvi Choudhary
भारतात डायबिटीजच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. धकाधकीच्या जीवनामुळे खाण्यापिण्यावर लक्ष न दिल्याने, सतत चिंतेत असल्याने, झोपेचा अभाव, एकाच जागी काम करत राहिल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात डायबिटीजची लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरात हळूहळू बदल दिसतात.
तज्ज्ञांच्या मते, शारीरिक तपासणी, आहार पद्धतीत बदल केल्याने तुम्ही डायबिटीजवर नियंत्रण मिळवू शकता.
१) हात- पाय दुखणे ही डायबिटीजची सुरूवातीची लक्षणे असू शकतात यामध्ये शरीरातील जखमा लवकर बऱ्या न होणे, थकवा आणि वारंवार लघवीला जाणे ही देखील लक्षणे जाणवतात.
२) रात्री लघवीला वारंवार जाणे, नेहमीपेक्षा जास्त तहान लागणे हे रक्तातील साखर वाढल्याची लक्षणे असू शकतात.
३) हात पाय सुन्न होणे, अशक्तपणा, अचानक वजन कमी होणे आणि अंधुक दिसणे ही देखील डायबिटीजची सुरूवातीची लक्षणे असू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.