Hair Growth Tips: केस गळणं होईल कायमचं बंद! डोक्यावर नवीन केस आणेल 'हा' १ चमत्कारी काळा पदार्थ

Surabhi Jayashree Jagdish

केसांच्या समस्या का वाढतात?

प्रदूषण, तणाव, अपुरा आहार आणि हार्मोन्समधील बदल यामुळे केसांच्या समस्या होतात. रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर केल्याने टाळू कोरडं पडणं, कोंडा आणि केस गळण्याच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे केसांची योग्य निगा राखणं तितकेच महत्त्वाचं आहे.

Hair Fall Home Remedies | saam tv

कलोंजीचे तेल

कलोंजीच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स, आवश्यक फॅटी ॲसिड्स आणि विविध पोषक घटक आढळतात. हे घटक टाळूला पोषण देण्यास आणि केसांच्या मुळांना बळकटी देण्यास मदत करू शकतात. नियमित वापरामुळे केस अधिक मजबूत, मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते.

Black Seed Oil Benefits | saam tv

कलोंजीच्या तेलाने मसाज

कलोंजीचे तेल किंचित कोमट करून ते थेट टाळूवर लावावं. त्यानंतर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करून तेल काही तास किंवा रात्रभर केसांमध्ये ठेवावं. दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस धुतल्यास चांगला परिणाम मिळू शकतो.

Kalonji Oil Benefits | saam tv

नारळाच्या तेलासोबत वापर

दोन चमचे कलोंजीचे तेल आणि दोन ते तीन चमचे नारळाचं तेल एकत्र मिसळावं. हे मिश्रण हलकं गरम करून केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावावं.

Natural Hair Care | saam tv

हेअर मास्क

एक चमचा कलोंजीचे तेल, कोरफडीचा गर, कांद्याचा रस किंवा कडीपत्त्याची पेस्ट तसंच थोडं दही किंवा मध एकत्र करून पेस्ट तयार करावी. हा मास्क संपूर्ण टाळू आणि केसांवर ३० ते ४५ मिनिटं लावून ठेवावा. आठवड्यातून एक ते दोन वेळा वापरल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते.

Healthy Hair Tips | saam tv

बियांपासून तेल तयार करा

खोबरेल तेलात कलोंजीच्या बिया मंद आचेवर उकळून घरच्या घरी तेल तयार करता येतं. हे तेल थंड झाल्यानंतर गाळून नियमित वापरासाठी साठवून ठेवावं.

Hair Strengthening Oil | saam tv

या गोष्टी लक्षात ठेवा

कलोंजीचं तेल वापरण्यापूर्वी त्वचेवर छोटा पॅच टेस्ट करणं योग्य ठरतं. कोणतीही ॲलर्जी, खाज किंवा जळजळ जाणवल्यास वापर थांबवा. केस खूप प्रमाणात गळत असतील किंवा टक्कल पडत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Hair Care Routine | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Chest Pain | saam tv
येथे क्लिक करा