Shreya Maskar
आपण रोजच्या जेवणात चपाती खातो, मात्र तुम्हाला शरीरात भन्नाट बदल हवे असतील तर एक महिना गहूचे पदार्थ खाणे बंद करा, याचा आपल्या शरीरावर कसा चांगला परिणाम होतो, जाणून घेऊयात.
गहूमध्ये ग्लूटेन आणि कर्बोदके जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरात पाणी साठते आणि चरबी वाढते. गहू खाणे सोडलात तर कॅलरीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) उच्च असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. गहू खाणे टाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कायम नियंत्रणात राहील.
अनेक लोकांना ग्लूटेनची संवेदनशीलता असते, ज्यामुळे त्यांना सतत ॲसिडीटी, गॅस, अपचन, पोट फुगणे या समस्या उद्भवतात. गहू टाळल्याने आतड्यांवरील दाब कमी होतो, पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके वाटते.
जास्त प्रमाणात गहू खाल्ल्यानंतर लोकांना अनेकदा सुस्ती आणि आळस जाणवतो. जेव्हा तुम्ही गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा प्रथिने-तंतुमय पदार्थ खाता, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीर दिवसभर उत्साही राहते.
गहू टाळल्याने शरीरातील दाह कमी होतो. याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे मुरुमे, पिंपल्स आणि निस्तेजपणा कमी होऊन तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते.
अचानक गहू पूर्णपणे बंद केल्याने शरीरात फायबरची कमतरता होऊ शकते. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, ओट्स यांचा आहारात समावेश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.