Surabhi Jayashree Jagdish
फ्रिजमध्ये कोथिंबीर ठेवली तरी ती काळी पडते. ज्यामुळे तिचा ताजेपणा आणि चव कमी होते. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास कोथिंबीर लांब काळ हिरवी आणि ताजी राहू शकते. यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्सचा वापर करा.
कोथिंबीर आणल्यानंतर ती स्वच्छपणे पाण्यात धुवा. धुतल्यानंतर त्यावर असलेलं पाणी पूर्णपणे काढून टाका. ओलसर कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवली तर ती लवकर काळी पडते.
कोथिंबीर साठवताना तिला टॉवेलमध्ये गुंडाळा. टॉवेल ओलावा शोषून घेतं आणि त्यामुळे कोथिंबीर कोरडी राहते. ज्यामुळे ती अधिक दिवस ताजीत राहते.
कोथिंबीर नेहमी एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. बाहेरील हवा आणि ओलावा आत जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे कोथिंबीरचा ताजेपणा अधिक काळ टिकतो.
कोथिंबिरीचे देठ थोडे कापून एका ग्लासमध्ये पाणी घाला आणि त्यात उभे ठेवा. ही पद्धत फुलांसारखी आहे आणि त्यामुळे कोथिंबीर ताजी राहते.
कोथिंबीर साठवताना जास्त ओली राहणार नाही याची काळजी घ्या. जास्त पाणी असल्याने पानं लवकर खराब होतात. त्यामुळे साठवण्यापूर्वी कोथिंबीर चांगली कोरडी असणं आवश्यक आहे.
कोथिंबीर साठवण्यापूर्वी खराब किंवा काळी झालेली पानं वेगळी करा. खराब पानं चांगल्या पानांनाही खराब करतात.