ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या घरी अनेकदा वर्षभराचे धान्य साठवून ठेवले जाते.
अनेकवेळा साठवून ठेवलेल्या धान्याला किड लागते,अशा वेळी काय करावे समजत नाही.
चला तर मग पाहूयात कीड लागू नये म्हणून काय उपाय करावे.
साठवून ठेवलेल्या धान्यात लवंग ठेवल्याने धान्याला किड लागण्यापासून संरक्षण होते.
साठवलेल्या धान्यात हळकुंड ठेवल्याने धान्याला किड लागत नाही.
साठवून ठेवलेल्या धान्यात लसूण ठेवल्याने धान्याला किड लागत नाही.
मोहरीचे तेलाने ही धान्याला कीड लागण्यापासून संरक्षण होते.
कडुलिंबाचा पाला धान्यात मिसळ्याने धान्याला कीड लागत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.