Dhanshri Shintre
व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजिंगसाठी नाही, तर कॉलिंग आणि सोशल मीडिया फीचर्ससह एक पूर्ण डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बनले आहे.
व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजिंगसाठी नाही, तर कॉलिंग आणि सोशल मीडिया फीचर्ससह एक पूर्ण डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बनले आहे.
हे फीचर पाठवणाऱ्यांसाठी उपयुक्त असले तरी, प्राप्तकर्ते अनेकदा नाराज होतात कारण त्यांना डिलीट झालेल्या मेसेजचा मजकूर जाणून घ्यायचा असतो.
काही युजर्स डिलीटेड मेसेज पाहण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात, पण अँड्रॉइडमध्ये सेटिंगद्वारेही हे सहज शक्य होते.
डिलीट झालेल्या मेसेजेस वाचण्यासाठी, तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन हिस्ट्री फीचर अॅक्टिव्हेट करावे लागेल.
तुम्ही नोटिफिकेशन पर्यायातून हिस्ट्री फीचर सुरू करू शकता किंवा सेटिंगमध्ये जाऊन थेट ‘नोटिफिकेशन हिस्ट्री’ शोधून अॅक्टिव्ह करू शकता.
हा फीचर अॅक्टिव्ह केल्यानंतर, तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्रीत गेल्या २४ तासांतील सर्व मेसेज सहजपणे पाहू आणि वाचू शकता.
तुम्ही मेसेज डिलीट केला तरी तो नोटिफिकेशन हिस्ट्रीत दिसू शकतो, पण फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ पाहता येणार नाहीत.
फक्त त्याच मेसेजेस नोटिफिकेशन हिस्ट्रीत दिसतील, ज्यांची सूचना तुम्हाला मिळालेली आहे. सूचना न मिळाल्यास, मेसेज इथे दाखवला जाणार नाही.