ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज सकाळी रिकाम्या पोटी ३-४ मऊ कडुलिंबाची पाने चावल्यास शरीराच्या अनेक समस्या टाळता येतात आणि आरोग्य सुधारते.
गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात.
दररोज कडुलिंबाची पाने चावल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि डायबिटीज नियंत्रणात राहते.
सकाळी उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी व उजळते.
कडुलिंब खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास नैसर्गिकरीत्या मदत होते.
उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने यकृत स्वच्छ राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.