Headache Symptoms: वारंवार डोकेदुखी होतेय? 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दैनंदिन ताणतणाव

दैनंदिन ताणतणाव, असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे डोकेदुखी सामान्य झाली असून, काहीवेळा ती गंभीर आजाराची सूचनाही असू शकते.

डोकेदुखीमागे कोणती कारणं

आज आपण जाणून घेणार आहोत की अधूनमधून होणाऱ्या डोकेदुखीमागे कोणती कारणं असू शकतात आणि त्यावर उपाय काय आहेत.

वेदनादायक समस्या

क्लस्टर डोकेदुखी ही अधूनमधून होणारी वेदनादायक समस्या असून, ती प्रामुख्याने २० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळते आणि दुर्मिळ मानली जाते.

डोकेदुखीने त्रस्त

या प्रकारच्या डोकेदुखीने त्रस्त लोकांना काही आठवड्यांसाठी वारंवार त्रास होतो, एका दिवशी ७-८ वेळा तीव्र वेदना जाणवतात.

दारूचे सेवन

दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे दारू पिणाऱ्यांना अधूनमधून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

डार्क चॉकलेटचे अधिक सेवन

मांस, लसूण आणि डार्क चॉकलेटचे अधिक सेवन केल्यास डोकेदुखीची शक्यता वाढते, त्यामुळे ही खाद्यपदार्थ मर्यादेतच खाणे आवश्यक आहे.

डोळे लाल होणे

डोकेदुखीच्या त्रासादरम्यान काही लोकांना डोळे लाल होणे, पाणी येणे, नाक बंद होणे, पापण्यांमध्ये सूज यांसारख्या लक्षणांचा अनुभव येतो.

NEXT: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

येथे क्लिक करा