Bharat Jadhav
आपल्यातील बहुतेकजण रात्री जेवणावेळी उरलेला भात फेकून देत नाहीत. दुसऱ्या दिवशी तो भात खातात किंवा त्याचा फोडणीचा भात बनवून खातात.
शिळं अन्न खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही, ताजं अन्नच खावं असं सांगितलं जातं. त्यामुळे शिळा भात खाल्ल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो, असा प्रश्न पडतो.
शिळा भात आरोग्यासाठी चांगलं असल्याचं डायटिशिअन सांगतात. एका आहारतज्ज्ञाने सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी शिळा भात खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
तांदळात पाणी टाकतो आणि तो शिजवतो, तेव्हा तांदळात असलेल्या स्टार्चमुळे ते शिजून भात बनत असतो. पण जेव्हा हा शिजवलेला भात आपण फ्रिजमध्ये 4 अंश सेल्सिअसवर 12 ते 16 तास ठेवतो. तेव्हा रेट्रोग्रेडेशनची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्यातील सामान्य स्टार्चचं रूपांतर रेजिस्टन्स स्टार्चमध्ये होतं.
रेजिस्टन्स स्टार्चचे आरोग्याला खूप फायदे होत असतात. रेजिस्टन्स स्टार्चमुळे भाताचा ग्लायसेमिक लोड कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. म्हणूनच डायबेटिक रुग्णांसाठी शिळा आणि थंड केलेला भात अधिक चांगला पर्याय ठरत असतो.
हा स्टार्च हा स्टार्च प्रीबायोटिक म्हणून काम करतो. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया याचं किण्वन करून ब्युटीरेटसारखे शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स तयार करत असतं. हे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे हे पचनक्रिया, आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
भात आणि बटाट्यासारखे स्टार्चयुक्त अन्न फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास ते ताज्या शिजवलेल्या अन्नापेक्षा अधिक पौष्टिक ठरतात", असं आहारतज्ज्ञ भावेश गुप्ता यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलंय.
वरील माहिती आम्ही फक्त वाचकांपर्यंत पोहचवत आहोत. याचा दावा साम टीव्ही करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.