Ruchika Jadhav
हिरव्या जरीच्या साडीत स्पृहा कमालीची सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हिरवा चुडा देखील भरलाय.
सिंपल मेकअप हेवी इअररींग्स या सर्वांत बांधनीची हिरवी साडी स्पृहाने परिधान केलीये.
स्पृहा नेहमीच साधी आणि सिंपल राहते. तिच्या साधेपणातच तिचं सौंदर्य दडलं आहे.
स्पृहाने गायनासह अभिनयातही आपली दमदार कामगिरी बजावली आहे.
स्पृहाच्या सुमधूर आवाजाचे लाखो चाहते आहेत.
स्पृहाने मायबाप या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम केलं. तेव्हापासून तिने अभिनयाला सुरूवात केली.
तिचा लॉस्ट अँड फाउंड हा चित्रपट देखील प्रेक्षकांना फार आवडला.