Shreya Maskar
रविवारी जेवणासाठी खास चटपटीत बेत करा. तुम्ही गरमागरम मिक्स कडधान्याची उसळ आणि बटर पावचा आस्वाद घ्या.
मिक्स कडधान्याची उसळ बनवण्यासाठी बटाट्याचे तुकडे, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, मोड आलेले कडधान्य इत्यादी साहित्य लागते.
मिक्स कडधान्याची उसळ बनवण्यासाठी तुमच्या आवडती कडधान्य रात्रभर भिजत ठेवा. ज्यामुळे त्याला मोड येतील. तुम्ही यात सर्व प्रकारच्या कडधान्यांचा वापर करा.
सकाळी एकीकडे गरम पाण्यात कडधान्य स्वच्छ धुवून घ्या. तर दुसरीकडे बटाटा सोलून त्यांचे चौकोनी तुकडे करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्या. कांद्याला चांगले तेल सुटू द्या.
त्यानंतर यात आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून चांगले शिजवून घ्या.
त्यानंतर यात भिजवून मोड आलेले मिक्स कडधान्य आणि बटाट्याचे तुकडे घालून कपभर पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.
मिक्स कडधान्याची उसळीला एक उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर घाला. गरमागरम बटरसोबत मिक्स कडधान्याची उसळचा आस्वाद घ्या.