Shreya Maskar
पापड करी बनवण्यासाठी पापड, टोमॅटो, बटाटा, आलं, लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला, पिठी साखर, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पापड करी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पापड गोल्डन फ्राय करा. गॅस मंद आचेवर ठेवा. जेणेकरून पापड जळणार नाही.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, तळलेल्या बटाट्याचे तुकडे गोल्डन फ्राय करा. बटाटा तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका.
यात टोमॅटो आणि आल्याची पेस्ट टाका. आता मिश्रणात तिखट, हळद, गरम मसाला, धणे पूड आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
भाजीत छोटी वाटीभर पाणी टाकून एक उकळी काढू घ्या. ५ मिनिटे भाजी शिजवा.
शेवटी गॅस बंद करून पापडाचे तुकडे यात टाका आणि वरून कोथिंबीरने गार्निश करा. ही रेसिपी बनवायला अगदी सिंपल आहे.
गरमागरम पापड करीची चपातीसोबत आस्वाद घ्या. तसेच तुम्ही भातासोबतही हा पदार्थ खाऊ शकता.
कायम लक्षात घ्या, भाजी खाण्याच्या वेळी त्यामध्ये पापडाचे तुकडे टाका, जेणेकरून भाजी खाताना पापडाचा कुरकुरीतपणा लागेल.