Siddhi Hande
प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
तुम्हाला जर काहीतरी चटपटीत आणि पौष्टिक खायचे असेल तर तुम्हा कडधान्याचे सॅलड बनवू शकतात.
कडधान्याचे सॅलड बनवण्यासाठी अवघे काही मिनिटे लागतात. हे खूप चविष्ट लागते. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठीही बेस्ट ऑप्शन आहे.
सर्वात आधी तुम्हाला कडधान्ये रात्रभर भिजत ठेवायची आहेत.मटकी, मूग, चणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कडधान्ये घ्या.
यानंतर मोड आलेली कडधान्ये हलकी उकळून घ्या. ही कडधान्ये जास्त शिजवू नका.
यानंतर शिजवलेली कडधान्ये एका भांड्यात घ्या. त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो आणि काकडी टाका.
यावर थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका.
या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून सर्व एकदम मस्त मिक्स करुन घ्या.