Shruti Vilas Kadam
केस कापल्यानंतरही अनेकदा स्प्लिट एंड्स त्यामुळे केस फार रुखे दिसतात.
प्रत्येक वेळी स्पा किंवा सलोनला जाण्याऐवजी, एक सोपा आणि परिणामकारक घरगुती उपाय वापरता येतो, जो केमिकलमुक्त आहे.
या उपायासाठी फक्त दोन सोपे घरगुती घटक वापरावेत नारळाचे तेल आणि नैसर्गिक पद्धतीने प्राप्त शुद्ध मध
एका बाऊलमध्ये थोडे नारळ तेल घ्या, त्यात थोडासा मध मिसळा आणि एकसारखे फेटाळून पेस्ट तयार करा. हेच तुमचे नैसर्गिक हेअर मास्क.
प्रथम केस स्वच्छ करून घ्या, मग हाताने हे मास्क केसांच्या मुळपासून ते शेवटापर्यंत लावा, नंतर किमान ४० मिनिटे तसेच ठेवावे.
४० मिनिटे झाल्यावर शँपूने केस स्वच्छ धुतले तर हेअर मास्कचे पोषणपूर्ण गुण केसांना मिळतात.
हे घरगुती उपाय त्वरित आणि नैसर्गिकरीत्या केसांना पोषण देतो, किमान खर्चात आणि कोणतेही रसायन न वापरता ते केसांना चमकदार, मजबूत व निरोगी बनवते.