Manasvi Choudhary
पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये ज्याने पैसा टिकत नाही ते जाणून घ्या
वास्तूशास्त्रानुसार, एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये. यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते.
पर्समध्ये देव देवतांचे फोटो ठेवू नये.
अनेकजण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई-वडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं.
अनेकजण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमटून ठेवतात. मात्र यामुळे वास्तू दोष निर्माण होवू शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं.
वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यवहारामध्ये नुकसान होवू शकतं.
तसचं पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थित संकट निर्माण होवू शकतं.