Shree Swami Samartha Mantra: रोज फक्त हा एक मंत्र जपा आणि बघा बदल, अशक्य ही श्क्य करतील स्वामी

Manasvi Choudhary

स्वामी समर्थ मंत्राचा जप

नियमितपणे सकाळी व संध्याकाळी ११ माळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा.

कधी करावा मंत्राचा जप

सांयकाळी देवपूजा केल्यानंतर नियमितपणे स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा.

मंत्र

स्वामी समर्थाचा तारक मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे.

नि:शंक हो निर्भय हो मना रे।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।

अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।

अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।

स्वये भक्त - प्रारब्ध घडवी हि माय ।।

आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।

परलोकीही ना भीती त्याला ।।२।।

उगाची भितोसी भय हें पळू दे ।

जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।

नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।।३।।

Shree Swami Samartha Mantra

खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।

कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।

कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।

नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।।

Shree Swami Samartha Mantra

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।

स्वामीच या पंच प्राणामृतात ।।

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

Shree Swami Samartha Mantra | canva

NEXT: तुम्हीही जास्त प्रमाणात साखर खाताय? होऊ शकतात हे गंभीर आजार

येथे क्लिक करा..