Manasvi Choudhary
मार्जरी आसन हे आसन पाठीच्या कण्याला लवचिक बनवण्यासाठी आणि मणक्यांमधील दाब कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
गुडघे आणि हातांवर उभं राहून प्राण्यासारखी स्थिती घ्या. श्वास घेताना मान वर करा आणि पाठ खाली वाकवा. श्वास सोडताना मान खाली करा आणि पाठ वरच्या दिशेला खेचा.
स्लिप डिस्क किंवा लोअर बॅक पेन साठी हे रामबाण आसन आहे. पोटावर झोपून हातांच्या सहाय्याने शरीराचा पुढचा भाग वर उचला. कोपर थोडे वाकलेले ठेवा आणि आकाशाकडे पहा.
जमिनीवर पालथे पडून हातांच्या आणि पायांच्या जोरावर शरीर वर उचला आणि 'V' आकार बनवा. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
हे एक विश्रांती देणारे आसन आहे जे पाठीच्या खालच्या भागाला आराम देते. गुडघ्यांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा आणि हात पुढे किंवा मागे सरळ सोडा.
सेतू बंधासन पाठीवर झोपून गुडघे दुमडा. आता हातांनी घोटा पकडण्याचा प्रयत्न करत कंबर वर उचला.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.