Shreya Maskar
पालक आणि मुगाचे सूप बनवण्यासाठी पालक, हिरवे मूग, कांदा, लसूण पाकळ्या, दालचिनी, मीठ, मिरपूड, साखर, मैदा इत्यादी साहित्य लागते.
पालक आणि मुगाचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
आता कुकरमध्ये पालक, मूग, कांदा, लसूण पाकळ्या, दालचिनी तुकडा आणि पाणी घालून शिजवून घ्या.
हे मिश्रण नंतर एकजीव करून गाळणीने गाळून घ्या.
छोट्या बाउलमध्ये दोन चमचे मैदा आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट करा.
सूपमध्ये ही पेस्ट घाला आणि त्यावर मीठ, मिरपूड, किंचित साखर घालून उकळून घ्या.
सूप सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर घाला.