Shreya Maskar
साउथ इंडियन स्टाइल मेदू वडा बनवण्यासाठी उडीद डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, कढीपत्ता, नारळाचे तुकडे, काळी मिरी, मीठ आणि तेल इत्यादी पदार्थ लागतात.
मेदू वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी पाणी घालून जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
आता पीठ चांगले ढवळत राहा. जेणेकरून पीठ मऊ होईल.
या मिश्रणात बारीक खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा.
आता या पिठाचे गोळे करून त्यांना मेदू वड्याचा आकार द्या.
मंद आचेवर तेलात गोल्डन होईपर्यंत वडे तळून घ्या.
अशाप्रकारे साउथ इंडियन स्टाइल सॉफ्ट अन् फ्लफी मेदू वडे तयार झाले.
मेदू वड्याचे पीठ एक चमचा पाण्यात टाका ते पाण्याच्या वर तरंगले म्हणजे तुमचे पीठ तयार झाले समजते.