Shreya Maskar
रस्सम बनवण्यासाठी टोमॅटो, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, चिंच, हळद, हिंग , लाल मिरची, तेल, पाणी, मीठ, जिरे, लसूण आणि काळी मिरी इत्यादी साहित्य लागते.
रस्सम बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरला जिरे, लसूण, लवंग, कोथिंबीर आणि काळी मिरी घालून घट्ट पेस्ट बनवा.
आता पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घालून छान परतून घ्या.
या मिश्रणात आल-लसूण-मिरची आणि खडा मसाल्याची पेस्ट टाकून सर्व मस्त एकजीव करा.
त्यानंतर पॅनमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
टोमॅटोचे मिश्रण छान मऊ झाल्यावर त्यात चिंचेचा अर्क आणि पाणी घालून मिक्स करा.
१० मिनिटे रस्सम चांगले शिजवून घ्या.
शेवटी एक उकळी आल्यावर रस्समवर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भातासोबत स्वादिष्ट रस्समचा आस्वाद घ्या.