Shreya Maskar
साउथ इंडियन स्टाइल सांबर बनवण्यासाठी तेल, कोथिंबीर, तूर डाळ, मीठ, साखर, सांबर मसाला, चिंचेचा कोळ, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची इत्यादी पदार्थ लागतात.
भेंडी , बीन्स, टोमॅटो, भोपळा, कांदा इत्यादी भाज्या लागतात.
सांबर बनवण्यासाठी तूर डाळ, मीठ आणि पाणी टाकून कुकरमध्ये उकडवून घ्या.
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्व भाज्या तळून घ्या.
या भाजीमध्ये थोडे पाणी, साखर, सांबर मसाला, चिंचेची पेस्ट आणि शिजवलेले डाळ घालून छान परतून घ्या.
सांबरच्या फोडणीसाठी पॅनमध्ये तेल, मोहरी, लाल मिरचीच आणि कढीपत्ता घालून तळून घ्या.
आता या फोडणी सांबरमध्ये मिसळून त्यात वरून कोथिंबीर घालून सजवा.
साउथ इंडियन स्टाइल सांबर मऊ इडलीसोबत खा.