Shreya Maskar
डाळ टिक्की बनवण्यासाठी मूग डाळ, बेसन, उकडलेले बटाटे, कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरवि मिरची, हळद, तेल आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
डाळ टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळीत उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
बटाट्याच्या मिश्रणात बेसन, चिरलेला कांदा आणि लसूण-आले पेस्ट घाला.
आता यात जिरेपूड, मीठ, तिखट, हळद घालून छान एकत्र करून पीठ मळून घ्या.
तयार झालेल्या मिश्रणाची गोलकार टिक्की बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात डाळ टिक्की गोल्ड फ्राय करा.
डाळ टिक्कीचा आस्वाद तुम्ही टोमॅटो सॉस, पुदिना चटणीसोबत घेऊ शकता.
डाळ टिक्की अधिक पौष्टिक वाढवण्यासाठी त्यात ड्रायफ्रूट्स घाला.