Shreya Maskar
पालक इडली बनवण्यासाठी रवा, पालकाची पाने, आले, हिरवी मिरची, मीठ , तेल, कांदा आणि दही इत्यादी साहित्य लागते.
पालक इडली बनवण्यासाठी पालक नीट स्वच्छ धुवून पाने उकळून घ्या.
पालक थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये त्याची प्युरी तयार करा.
एका बाऊलमध्ये रवा आणि दही घालून चांगले फेटून घ्या.
१५ ते २० मिनिटे पीठ झाकून ठेवा. म्हणजे रवा चांगला फुलतो.
यात पालक प्युरी, कांदा, हिरवी मिरची , किसलेले आले, गाजर आणि इतर भाज्या मिक्स करा.
तयार पिठात मीठ आणि इनो घालून चांगले फेटून इडली पात्रात मिश्रण भरा.
२०-२५ मिनिटांत इडली चांगली शिजेल. नारळाची चटणीसोबत पालक इडली आस्वाद घ्या.