ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गर्भवती महिलांना नेहमी काहीतरी चटपटीत, मसालेदार, आंबट-गोड पदार्थ खावेसे वाटत असतात. ज्याला आपण 'डोहाळे लागणे' असे म्हणतो.
गर्भवती महिलांना डोहाळे लागण्याची अनेक कारणे असू शकतात. पण काही मुख्य कारणे आहेत.
गर्भधारणेदरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात. यामुळे जिभेच्या चवीमध्येही बदल होतात आणि चटपटीत,मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते.
काहीवेळा शरीराला विशिष्ट पोषक तत्त्वांची कमतरता जाणवते. मसालेदार पदार्थांमधील घटक ही कमतरता पूर्ण करतात.
होर्मोनल बदलांमुळे मूड स्विंग्स होतात. चटपटीत खाणे मूड स्विंग्स नियंत्रित करू शकते.
मसालेदार पदार्थ जिभेची चव वाढवतात ज्यामुळे ते आणखी खावेसे वाटतात. अशाने भूक वाढते.
काही महिलांना मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा अपचन होण्याची शक्यता असते.
मसालेदार आणि चमचमीत पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे योग्य ठरते. जड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
गर्भवती महिलांनी कोणते पदार्थ खावे किंवा कोणते नाही याबाबत त्यांच्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.