Shreya Maskar
गणेशउत्सावात खूप गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणाला चटपटीत बीटरूट राईस बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच लिहून घ्या.
बीटरूट राईस बनवण्यासाठी शिजवलेला भात, बीट, लसूण, किसलेले आले, कांदा, हिरवी मिरची, मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, काजू, गरम मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर, तूप आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
बीटरूट राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, काजू आणि कढीपत्ता घालून गोल्डन फ्राय करा.
यात बारीक चिरलेला लसूण, किसलेले आले आणि हिरव्या मिरच्या घाला. लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आणि सुगंध येण्यासाठी १ मिनिट परता.
चिरलेला कांदा मध्यम आचेवर हलका तपकिरी होईपर्यंत परता. किसलेले बीट आणि चवीनुसार मीठ घाला. पॅनवर झाकण ठेवून बीट मऊ होईपर्यंत ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
त्यानंतर गरम मसाला मिक्स करा. हा मसाला बीटचा गोडवा कमी करतो आणि भाताला आंबट-तिखट चव देतो. तुम्हाला हवे तर यात पावभाजी मसाला देखील टाकू शकता.
आता शिजलेला भात मिक्स करा. हलक्या हाताने ढवळा, जेणेकरून भाताला सर्व मसाले आणि बीटचा सुंदर रंग लागेल.
शेवटी झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे वाफ येऊ द्या. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. रायता किंवा पापड सोबत गरमागरम सर्व्ह करा.
NEXT : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स