ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उडदाच्या डाळी पासून स्वादिष्ट अशी आमटी बनवली जाते. हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे. तसेच ही आमटी शरिराकरिता पौष्टिक मानली जाते. तर जाणून घ्या उडदाची आमटी कशी बनवली जाते.
उडदाची डाळ १ कप, हळद, हिंग , मीठ, लाल मिरच्या. लसून , जिरे, राई, तेल , कढिपत्ता, कांदा , लालतिखट, मसाले आणि कोथिंबीर इ. साहित्य लागते.
लाल मिरच्या जीरे आणि लसूण खलबत्यात किंवा मिक्सरमध्ये चांगले बारिक वाटून घ्या. त्याची झणझणीत अशी पेस्ट बनवा.
एका कुकरमध्ये उडदाची डाळ घ्या आणि ती स्वच्छ २ ते ३ वेळा धुवून घ्या. धुतल्यानंतर त्यात हिंग, हळद आणि तयार केलेली लाल मिरच्यांची पेस्ट तुमच्या अंदाजानुसार टाका आणि झणझणीतपणा हवा असल्यास मसाला टाका. आता डाळ शिजवत ठेवा.
फोडणीकरिता एक कढई घ्या. कढईत तेल टाका आणि ते चांगले तापवून घ्या जेणेकरुन फोडणीचा तडका बसेल.
आता तेलात मोहरी टाकून तिली तडतडू द्या. नंतर जिरे घालून लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या टाका. नंतर थोडे हिंग, हळद घालून फोडणी तयार ठेवा.
शिजवलेली डाळ रवीने मोडा आणि मऊ लुसलुसीत करुन घ्या. आता तयार केलेल्या फोडणीत शिजलेली डाळ ओता आणि मस्त झणझणीत फोडणी देऊन ढवळून घ्या.
डाळ खुप घट्ट वाटत असेस तर त्यात थोडे पाणी घालून चवीनुसार मीठ टाका. आमटित वरुन तूपाचा एक चमचा घातल्यास चव आणखीन छान लागेल.
आमटीलाा ५ मिनिटे उकळवून घ्या. उकळी आल्यानंतर त्याच कोंथिबीर टाकून तीला सजवा. आमटी तयार आहे.
हि आमटी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत कुस्करून खाऊ शकता किंवा गरमागरम भातासोबत हि आमटी अप्रतिम लागते.