ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वातंत्रदिनापासून सलग सुट्या मिळाल्यामुळे अनेकांनी बाहेर जाण्याचे प्लॅन केले आहेत.
सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने १४ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.
मुंबई ते नागपुर आणि कोल्हापूरपर्यंत स्पेशल ट्रेन चालवण्याचा मध्य रेल्वे मोठा निर्णय
एलटीटी-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहचेल.
एलटीटी-नागपूर एसी सुपरफास्ट ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या सर्व स्थानकावर ट्रेन थांबेल.
सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल ट्रेन २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निघेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता कोल्हापूरला पोहचेल.
सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल ट्रेन कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या सर्व स्थानकावर ट्रेन थांबेल.
त्या शिवाय पुणे - २ नागपूर एसी सुपरफास्ट ट्रेन आणि कलबुर्गी-बेंगळूर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे.